शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या : कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:19 PM

मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देराज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाममायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

मायणी : मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.शैक्षणिक, पर्यटन, धार्मिक व खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या या गावात परिसरातील चितळी, कलेढोण, पाचवड, पडळ, धोंडेवाडी, निमसोड व सांगली जिल्ह्यातील माहुली व भिकवडी गावातील व परिसरातील वाड्या वस्त्यातील हजारो ग्रामस्थ रोज व्यापारासाठी व शासकीय कामासाठी येत असतात. प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल व व्यावसायिक शिक्षणासाठी याच भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात.

संपूर्ण गावामध्ये दिवसभर वर्दळ असते. मुख्य बाजारपेठेतून व गावातून जाणारा मल्हारपेठ-पंढरपूर हा एकमेव मार्ग असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची तसेच ग्रामस्थांची वाहने व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही याच मार्गावर लावलेली असतात.चारचाकी व दोनचाकी वाहनांसाठी कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे काही वाहनचालक राज्यमार्गाच्याकडेला किंवा बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करून खरेदीसाठी व बँक, शासकीय कामांसाठी जात असतात. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करून गेलेल्या वाहनचालकांमुळे राज्यमार्गावर सतत वाहतुकीची कोंडी तासन्तास होत असते.

त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकावर न येता चांदणी चौकातूनच विटा, सांगली, वडूज, दहिवडी, बारामतीकडे जातात. विटा आगाराने आठवडा बाजारदिवशी एसटी बसस्थानकावर येणार नाही, असे पत्रच संबंधितांना दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी