वाळूमाफीयांकडून रेतीची तस्करी
By Admin | Updated: January 8, 2015 22:52 IST2015-01-08T22:52:17+5:302015-01-08T22:52:17+5:30
सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यातून रेतीची तस्करी केली जात आहे. याकडे महसूल विभाग, वनविभाग व पोलीस विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने

वाळूमाफीयांकडून रेतीची तस्करी
परळी : कास गावानजीक सावरी (ता. जावळी) येथील घराला बुधवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले असून, चार लाखांचे नुकसान झाले आहे.
कास-बामणोली रस्त्यावर डोंगरकुशीत वसलेल्या सावरी या दुर्गम गावातील लक्ष्मी सखाराम शिंदे यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. परिसरात जोराचा वारा असल्याने विजेच्या तारा घासून शॉर्टसर्किट झाले असावे, असा अंदाज आहे. घनदाट झाडीत हे गाव वसले असल्याने शॉर्टसर्किटचे प्रकार वारंवार होतात. लक्ष्मी शिंदे या गावी एकट्याच राहतात. त्यांची दोन मुले मुंबईला राहतात. बुधवारी रात्री लक्ष्मी शिंदे या स्वयंपाक करून शेजारच्या घरात गेल्या होत्या, तेव्हा अचानक त्यांच्या घरास आग लागली. ग्रामस्थांनी प्रथम गावातील वीजपुरवठा बंद केला आणि नंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घराचे वासे लाकडी असल्याने तसेच घरात लाकूडफाटा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी असे दोन लाखांचे दागिने, धान्य, विम्यासंबंधीची कागदपत्रे, कपडे, भांडी असा चार लाखांचा ऐवज जळून नष्ट झाला. घटनेची माहिती समजताच तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लवकरात लवकर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)
चार तासांची
अथक झुंज
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीजपुरवठा ग्रामस्थांनीच बंद केला असल्याने अंधारात ही झुंज सुरू होती. गावात मोजकीच घरे असल्याने हाती लागेल त्या भांड्यातून पाणी आणून आगीवर मारले जात होते. आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ग्रामस्थ आगीशी अखंड लढत होते. मात्र, ही झुंज अपयशी ठरली.