शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

समर्थांचे ‘रामघळ’ विकासाच्या प्रतीक्षेत : पर्यटन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:16 AM

हणमंत यादव ।चाफळ : तीनशे पासष्ठ वर्षांचा इतिहास लाभलेल्या व पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ विभागातील सडादाढोली जवळील रामघळ कुबडीतीर्थाचा निधीअभावी विकास खुंटलाआहे. रस्त्याची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची व राहण्याची गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभावअशा एक ना अनेक समस्यांच्यागर्तेत हे पर्यटनस्थळ अडकलेआहे.या ठिकाणच्या समस्यांमुळे पर्यटकांसह भाविकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटन ...

ठळक मुद्देरस्ता, पिण्याच्या पाण्याची गैरसोय; शासनाबाबत पर्यटकांकडून नाराजी

हणमंत यादव ।चाफळ : तीनशे पासष्ठ वर्षांचा इतिहास लाभलेल्या व पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ विभागातील सडादाढोली जवळील रामघळ कुबडीतीर्थाचा निधीअभावी विकास खुंटलाआहे. रस्त्याची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची व राहण्याची गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभावअशा एक ना अनेक समस्यांच्यागर्तेत हे पर्यटनस्थळ अडकलेआहे.

या ठिकाणच्या समस्यांमुळे पर्यटकांसह भाविकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटन विभागाने येथील विकासासाठी निधी देऊन प्रलंबित विकास कामे मार्गी लावावी, अशी मागणी पर्यटक, भाविकांतूनहोत आहे.

चाफळच्या पश्चिमेस उंच डोंगर कपारीत चाफळपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर ‘रामघळ-कुबडीतीर्थ’ हे पर्यटनस्थळ आहे. ही घळ समर्थ रामदासांनी स्वत: बनवली असल्याने तिला अनन्यसाधारणमहत्त्व आहे.उंच महाकाय डोंगराच्या कड्यात निसर्गसौंदर्यात रामघळ वसलेआहे. गत दहा वर्षांपूर्वी या ठिकाणास प्रशासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा दिलाआहे.तसेच येथील रस्त्यासह उर्वरित विकासकामांसाठी भरघोस निधीही दिला होता. या निधीतून रामघळ परिसराच्या विकासाबरोबर रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, विकासकामांना अजून निधी न मिळाल्याने सध्या येथील विकास खुंटला आहे.समर्थांच्या वास्तवाने पावन झालेल्या या अनमोल ठेव्याचे जतन करून परिसराच्या विकासाच्या दृष्टीने येथे पर्यटन विभागाने निधीदेणे गरजेचे आहे. यासाठी येथील देवस्थान ट्रस्ट व सडावाघापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंचनथुराम झोरे प्रयत्न करीत असून, येथील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी जोर धरूलागली आहे.

तीर्थक्षेत्र रामघळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामार्इंच्या मूर्तीसह वसंतगड येथील जनार्दन महाराजांची सुंदरशी प्रतिकृती ट्रस्टच्यामाध्यमातून बसविण्यात आलीआहे. येथून जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या सडादाढोली गावचेग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट्र येथे समर्थ रामदास स्वामी व जर्नादन महाराजांच्यापुण्य भेटीचा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा केलाजातो.विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी पायी प्रवासरामघळीपासून शंभर मीटरच्या हाकेच्या अंतरावर सडादाढोली हे ३०० लोकसंख्येचे एक छोटंसं गाव आहे. गावात रस्त्याअभावी बस येत नसल्याने येथे येणाºया पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांना दाढोलीपर्यंत पायी चालत जावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता नसल्याने दहावीनंतर पुढील शिक्षण सोडून मुलांना मुंबईस कामास पाठवण्यात येथील पालक धन्यता मानत आहेत.कुबडीतीर्थासह झºयाचा विकास महत्त्वाचा...रामघळीपासून जवळच समर्थ रामदासांनी स्वत: हातातील कुबडीने दगड बाजूला करत निर्माण केलेला पाण्याचा झरा आहे. त्यास ‘कुबडीतीर्थ’ या नावाने ओळखले जाते. सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक नानाविध उपक्रम राबवले जात आहेत. परंतु निसर्गाचा अनमोल ठेवा व बारमाही पाण्याच्या झºयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. याच झºयाचे पाणी सडादाढोली येथील ग्रामस्थ बारमाही वापरत असतात. त्याचेही जतन होणे काळाची गरज आहे. 

आजारी व्यक्तींचे अतोनात हाल..येथील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास खराब रस्ता असूनही वाहनधारक गावात येण्यास तयार होत नाहीत. परिणामी आजारी रुग्णास डोलीतून रुग्णालयापर्यंत न्यावे लागत आहे. ही येथील वस्तुस्थिती आहे. यासाठी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.