पहिल्या दिवशी ९१ अर्जांची विक्री

By Admin | Updated: April 5, 2015 00:01 IST2015-04-04T23:57:59+5:302015-04-05T00:01:11+5:30

जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजे, जयकुमार, शंभूराज यांची आघाडी

Sales of 9 1 applications on the first day | पहिल्या दिवशी ९१ अर्जांची विक्री

पहिल्या दिवशी ९१ अर्जांची विक्री

सातारा : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार (दि. ४) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी ३४ जणांनी ९१ उमेदवारी अर्ज खरेदी केले. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी ४ अर्ज, आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी महेश बोराटे यांनी ५, आमदार शंभूराज देसाई यांच्यासाठी उत्तम कवर यांनी ४, तर राजेश पाटील यांच्यासाठी संतोष किर्दत यांनी १, प्रदीप विधाते यांच्यासाठी तुकाराम यादव यांनी २, अरुण विष्णू पवार यांनी स्वत:साठी २, प्रभाकर साबळे यांच्यासाठी राजेंद्र नांगरे यांनी ३, रवींद्र कदम यांच्यासाठी अमर मोकाशी यांनी १५, राजेंद्र यशवंत नेवसे यांनी स्वत:साठी ३, प्रमिला चंद्रकांत कदम यांच्यासाठी शरद कदम यांनी १, वसंतराव मानकुमरे यांनी स्वत:साठी २, गीतांजली कदम यांनी स्वत:साठी २, सचिनकुमार नलावडे यांनी स्वत:साठी २, सुरेश गायकवाड यांनी स्वत:साठी २, नंदकुमार गोडसे यांच्यासाठी विवेक देशमुख यांनी २, संतोष पवार यांच्यासाठी कल्याण देशमुख यांनी २, रंजना साळुंखे यांच्यासाठी महादेव साळुंखे यांनी ३, किशोर हिंदुराव साळुंखे यांनी स्वत:साठी २, सुरेश गंगाराम साळुंखे व रामभाऊ आनंदराव लेंभे यांच्यासाठी शांताराम फडतरे यांनी ४, सुरेखा रमेश पाटील यांनी स्वत:साठी १, डॉ. विजयराव बोरावके यांनी स्वत:साठी २, सुरेखा रमेश पाटील यांनी स्वत:साठी १, विश्वासराव विठ्ठलराव काळे यांनी स्वत:साठी १, नामदेव सीताराम गोडसे स्वत:साठी १, शामराव लक्ष्मणराव गाढवे व आनंदराव शेळके-पाटील यांनी स्वत:साठी प्रत्येकी २, दत्तात्रय नानासो बिचुकले यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी १, सुरेंद्र गुदगे यांनी स्वत:साठी ३, बाळकृष्ण हुबले यांच्यासाठी अर्जुन काळे यांनी २, सुनीता धैर्यशील कदम यांच्यासाठी ऋषिकेश ताटे यांनी २, बाळासाहेब शिरसट यांनी स्वत:साठी २, दिनकर पाटील यांच्यासाठी वैभव जाधव यांनी ५ उमेदवारी अर्ज खरेदी केले.
अर्ज दाखल करण्याची मुदत ४ ते ८ एप्रिल या कालावधीत आहे. या निवडणुकीसाठी दोन हजार २६८ मतदारांची नोंद झालेली आहे. हे मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत. निवडणुकीसाठी दि. ५ मे रोजी मतदान होणार आहे. माण तालुक्यातून सोसायट्यांचे सर्वांत जास्त २२ ठराव सादर झाले असून, नवीन ठरावांची मुदत संपली आहे. अर्ज खरेदीची किंमत शंभर रुपये असून, खुल्या गटासाठी उमेदवारी अर्ज भरताना दोन हजार रुपये इतकी, तर राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Web Title: Sales of 9 1 applications on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.