साक्षी पाटीलचे कुस्ती स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST2021-04-04T04:39:47+5:302021-04-04T04:39:47+5:30
चाफळ : श्री समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज ऑफ आर्टस,चाफळ (ता. पाटण, जि. सातारा) येथील दहावीमध्ये शिक्षण घेत असलेली ...

साक्षी पाटीलचे कुस्ती स्पर्धेत यश
चाफळ : श्री समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज ऑफ आर्टस,चाफळ (ता. पाटण, जि. सातारा) येथील दहावीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी साक्षी प्रमोद पाटील हिने कर्नाटक (बेल्लारी) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती (फ्रिस्टाईल) स्पर्धेत ५७ किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला.
तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. जे. कुंभार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समर्थ विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक संभाजी बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय चव्हाण, तसेच सर्व ग्रामस्थांच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सातारा विभाग प्रमुख शेजवळ यांनी अभिनंदन केले.