शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी साताऱ्यात काँग्रेसचे आंदोलन 

By नितीन काळेल | Updated: March 3, 2025 17:42 IST

सातारा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणा देत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

सातारा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणा देत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, अन्वर पाशा खान, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदींसह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.शासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर चुकीची वेळ आलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. पीक विमा योजनेतही घोटाळा झालेला आहे. याची सखोल चौकशी करावी. महिला आणि मुलीवर अत्याचार वाढत आहेत. यातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्याच्या पीक उत्पादनाला हमीभाव मिळायलाच हवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसagitationआंदोलन