शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदच्या नगराध्यक्षपदी सचिन शेळके यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:54 IST

लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर ...

लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे किरण चंद्रकांत पवार यांची नऊ विरुद्ध सहा मतांनी निवड झाली.सचिन शेळके यांनी काँग्रेसच्या स्वाती भंडलकर यांचा तर उपनगराध्यक्ष किरण पवार यांनी मेघा आप्पासाहेब शेळके यांचा नऊ विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. काँग्रेसचे नगरसेवक विकास केदारी हे गैरहजर राहिले, तर विद्यमान नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील यांना जिल्हाधिकारी यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरविल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.योवेळी स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, अ‍ॅड. सुभाष घाडगे उपस्थित होते. पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजूरकर व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली.नगराध्यपदाच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीच्या चोहोबाजूला सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नगरपंचायतीच्या आजूबाजूची शंभर मीटरपर्यंतची सर्व दुकाने बंद ठेवली.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदांच्या निवडी घोषित होताच लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावर राष्टÑवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत गुुलालाची उधळण केली.नगराध्यक्षांना भोवले अनधिकृत बांधकामलोणंदच्या नगराध्यक्षपदाच्या निवडी वेळी विद्यमान नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला. नगराध्यक्षांच्या मुलांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. अनधिकृत बांधकामाची सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. याबाबतचा निकाल मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला होता. नेमका नगराध्यपदाच्या दिवशीच निकाल दिला.