वडोलीच्या ग्रामस्थांचे एस. टी. आगाराला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:12+5:302021-02-06T05:13:12+5:30
यावेळी युवा संघटक सोमनाथ पवार, नीलेश पवार, सुनील पवार, रोहित पवार, दादासाहेब वाघमारे, प्रदीप पवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले ...

वडोलीच्या ग्रामस्थांचे एस. टी. आगाराला निवेदन
यावेळी युवा संघटक सोमनाथ पवार, नीलेश पवार, सुनील पवार, रोहित पवार, दादासाहेब वाघमारे, प्रदीप पवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडोली नीळेश्वर गावची एस. टी. सेवा गत नऊ महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक ठिकाणी एस. टी. सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. तसेच इतर कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना, आजारी रुग्णांना कऱ्हाडसह इतर ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच अनेकवेळा वाहनासाठी कोपर्डे हवेली गावापर्यंत चालत यावे लागत आहे. पुढचा प्रवासही जादा पैसे देऊन करावा लागत आहे. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी वडोली नीळेश्वर एस. टी. सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.