शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:27 PM

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली.

ठळक मुद्देपाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात; १०२ प्रवासी मृत्यू, २८२ जणांना कायमचे अपंगत्व

खंडाळा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मानवी जीवाचा कर्दनकाळ ठरलेले हे वळण कायमस्वरुपी काढण्यासाठी जनतेतून अनेकदा उठाव झाला होता. शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्यानंतर प्रशासनाने अखेर ‘एस’ वळण काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर गेल्या दोन वर्षांत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे धोकादायक वळणाच्या विळख्यातून प्रवाशांची सुटका कधी होणार? हा प्रश्न अधांतरीच आहे.

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. दरम्यान, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘एस’ वळण काढण्यासाठी ३९ खातेदारांचे सुमारे सव्वाचार एकर क्षेत्र नव्याने भूसंपादित करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातून जाणारा पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग तालुक्याच्या विकासाला दिशादर्शक ठरत असला तरी वाहनधारकांना व प्रवाशांना मृत्यूचा सापळाच ठरला आहे. याच महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेल्या ‘एस’ आकाराच्या वळणावर गत पाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये १०२ प्रवासी मयत तर सुमारे २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव उड्डाणपूल, खंबाटकीचा घाट व बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतरचे ‘एस’ वळण ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत. या अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही कायमस्वरुपी सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच आहे.

यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसले; परंतु त्यांच्या मागण्यांना केराची टोपली संबंधित विभागाकडून दाखवण्यात आली. खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर लोकांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ सुरू असून, वळण काढले जात नाही आणि उपाययोजनाही केल्या जात नाहीत, त्यामुळे तालुकावासीय, वाहनधारक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याला अनुसरूनच तहसील कार्यालय खंडाळा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ‘एस’ कॉर्नर काढण्याबाबत व नवीन रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली होती.

अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्यापही कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते, हे बºयाचदा चालकांच्या लक्षात येत नाही. पुढे अचानक ‘एस’ आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाºयास एक पाय गमवावा लागला होता. या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

खंबाटकी बोगदा आणि ‘एस’ वळणावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर नेहमीच तात्पुरती मलमपट्टी करीत असतात. कायमस्वरुपी उपाययोजना मार्गी लागली नसल्याने अद्यापही अपघात घडतात. तरीही याकडे डोळेझाकपणा केला जातोय. याबाबत नवीन बोगद्याचा मार्ग तारणहार ठरणार आहे; पण तो तातडीने व्हायला हवा.- अजित यादव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर