बोरगाव येथे ग्रामीण जागरूकता कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:51+5:302021-09-17T04:46:51+5:30
सातारा : बोरगाव (ता. सातारा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता ...

बोरगाव येथे ग्रामीण जागरूकता कार्यक्रम
सातारा : बोरगाव (ता. सातारा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. ए. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत चिराग कुलाळ यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन केले.
यावेळी चिराग याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची निगा, माती परीक्षण कसे करावे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, बीज प्रक्रिया व उगवण क्षमता, तसेच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मारुती ढाणे, विजय ढाणे, संदीप ढाणे, विनीत ढाणे, सूरज ढाणे, अजिंक्य साळुंखे, आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो आवश्यक आहे.