वडूजला रणनीती आखण्यात सत्ताधारी, विराेधक व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST2021-09-03T04:42:00+5:302021-09-03T04:42:00+5:30

लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात २०११ च्या जणगणनेनुसार नगरपंचायत हद्दीत सुमारे २५ हजार लोकसंख्येची नोंद करण्यात आली आहे. वडूज शहर ...

The ruling party and the opposition are busy strategizing for Vadodara | वडूजला रणनीती आखण्यात सत्ताधारी, विराेधक व्यस्त

वडूजला रणनीती आखण्यात सत्ताधारी, विराेधक व्यस्त

लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात

२०११ च्या जणगणनेनुसार नगरपंचायत हद्दीत सुमारे २५ हजार लोकसंख्येची नोंद करण्यात आली आहे. वडूज शहर हे तालुक्याचे ठिकाण बनल्याने आणि नव्यानेच नगरपंचायत स्थापन झाल्याने येथे सर्व सुखसुविधा मिळतील, या विश्वासाने परिसरातील अनेक नागरिक वडूजमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

(चौकट)

उत्पन्नवाढीचे प्रयत्न तोकडे

घरपट्टी, पाणीपट्टी, व्यापारी संकुलनाचे भाडे, आठवडा बाजार व शासकीय विविध अनुदाने हे नगरपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सत्ताधाऱ्यांकडून उत्पन्नवाढीसाठी कोणत्या योजना आखल्या नाहीत अथवा तसेच प्रयत्नही करण्यात आले नाही.

(चौकट)

यंदा नव्या चेहऱ्यांना संधी

शहराचा विकास साधण्याची नामी संधी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही होती. आता उर्वरित काळात तरी या संधीचे सोने करावे, अशी माफक आपेक्षा जनता व्यक्त करत आहे. यावेळची निवडणूक मागील निवडणुकीप्रमाणे प्रभाग रचनेवर न होता वाॅर्ड रचनेनुसार होणार आहे. यामुळे उमेदवार निवडतानाचे निकष पाळून उमेदवारी देताना पक्षप्रमुखांची कसोटी व कसरत पाहावयास मिळणार आहे. यंदा नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने नेत्यांपुढे पेचही उभा राहू शकतो.

(चौकट)

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी ५

काँग्रेस ५

भाजप ३

अपक्ष ४

लोगो : वडूज नगरपंचायत रणांगण

फोटो : वडूज नगरपंचायत

उद्याच्या अंकात : कोरेगाव नगरपंचायत

Web Title: The ruling party and the opposition are busy strategizing for Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.