वजराई धबधब्यासाठी रस्सीखेच

By Admin | Updated: August 1, 2016 00:40 IST2016-08-01T00:40:34+5:302016-08-01T00:40:34+5:30

सरपंचाचा आरोप : ‘कास वजराई धबधबा’ नावाचा फलक लावून फसवणूक

The rugged rope for the wobbly waterfall | वजराई धबधब्यासाठी रस्सीखेच

वजराई धबधब्यासाठी रस्सीखेच

सातारा : देशातील सर्वात उंच असलेल्या वजराई धबधब्यासाठी कास आणि भांबवली ग्रामस्थांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कास मंदिराजवळ ‘कास वजराई धबधबा’ असा फलक लावून पर्यटकांची फसवणूक झाल्याचा आरोप भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे यांनी केला आहे. त्यामुळे हा धबधबा नक्की कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुर्लक्षित निसर्ग अचानक भरघोस कमाई करून देऊ लागल्यानंतर माणसांमध्ये येणारे ‘भांबवलेपण साताऱ्याच्या पश्चिमेकडे दिसू लागले आहे. देशातील सर्वांत उंच वजराई धबधबा कोणाच्या हद्दीत हा वाद उफाळला आहे. या संदर्भात भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कास येथील काही ग्रामस्थांनी ‘कास वजराई धबधबा’ या नावाचा अनधिकृत फलक कास मंदिराजवळ लावून पर्यटकांची फसवणूक चालविली आहे. धबधबा दाखविण्याच्या नावाखाली विनापावत्या पर्यटकांकडून पैसे लुबाडले जात आहेत.
कास-भांबवली परिसरात भविष्यात उद्भविणारा वाद संपवण्यासाठी तसेच सौहार्दपूर्ण आणि शांततामय संबंध राहण्यासाठी कास येथील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामस्थांवर शासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. पर्यटकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाव वापरण्यास कायमची
बंदी घाला
सातारा वनखात्याच्या नोंदीप्रमाणे भांबवली वजराई धबधबा हा भांबवली गावच्या हद्दीत येतो. तेव्हा ‘कास वजराई धबधबा’ हे नाव वापरण्यास कायमची बंदी घालावी, अशी मागणीही मोरे यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

Web Title: The rugged rope for the wobbly waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.