शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

वळणावरची गोल रेल्वे धावणार सरळ रेषेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:57 IST

मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी

ठळक मुद्देलोहमार्गाचे दुपदरीकरण : आदर्कीतील बोगद्यातून प्रवास करताना अनेकजण काढत होते सेल्फी

आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी डोंगरातून, बोगद्यातून गाडी जाताना फोटो काढण्याचा मोह प्रवाशांना आवरत नसे. आता लोहमार्गाच्या दुपदरीकरणामुळे फेरबदल होऊन रुंदीकरण होणार असल्याने प्रवाशांना मिळणारे नयनरम्य दृश्य पडद्याआड जाणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.

मिरज-पुणे लोहमार्ग ब्रिटिशकाळात मीटर गेज सुरू होता. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६५ च्या दरम्यान जुन्या मीटर गेज लोहमार्गाशेजारून दुसरा ब्रॉडगेज लोहमार्ग टाकण्यात आला. त्यावेळी एकही तास मीटर गेज रेल्वेलाईन बंद न ठेवता ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू केला होता.

ब्रॉडगेजवर आंबळे, शिंदवणे, आदर्की येथे तीन बोगदे व जुना आदर्कीजवळ बोगद्याची रुंदी, उंची वाढवून त्यामधूनच लोहमार्ग सुरू केला होता. हा लोहमार्ग डोंगर-दऱ्यातून जात असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी धबधबे पाहावयास मिळतात. त्याबरोबर रेल्वे डब्यात बसले तर पाठीमागचा शेवटचा डबा पूर्ण पाहता येतो, अशी वळणे आहेत. त्यामुळे मिरज-पुणे लोहमार्ग पावसाळ्यात पर्यटन म्हणून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असत. त्यावर काही विद्यार्थी अभ्यासासाठी पॅसेंजर गाडीने प्रवास करीत असताना नयनरम्य ठिकाणे पाहून फोटोशन करताना पाहावयास मिळत असे.

आता मिरज-पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण होणार असल्याने जुन्या मीटर गेज लोहमार्गाच्या माती भरावावरून काही ठिकाणी दुरुस्ती करून लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण होणार आहे.पावसाळ्यात कोणाचा फिल..पॅसेंजर गाडींना तिकीटही कमी आहे. आदर्कीहून पुण्याला जायचे म्हटले तर फक्त २२ रुपये तिकिटाचे दर आहे. आदर्की-सालपे-वाठारपर्यंत मोठ्या प्रमाणात ‘एस’ वळणे, त्याबरोबर दोन बोगदे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणात आल्याचे फिल प्रवाशांना येतो.मिरज-पुणे लोहमार्गावर आदर्कीजवळचे नयनरम्य दृश्य आता वळणाच्या दुपदरीकरणामुळे काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे