रणजित शेवाळेंना रोटरीच्या ‘बेस्ट असिस्टंट गवर्नर’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:36+5:302021-08-18T04:45:36+5:30
कऱ्हाड : येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी रणजित शेवाळे यांना राज्यातील तेरा जिल्ह्यातून ‘बेस्ट असिस्टंट गवर्नर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

रणजित शेवाळेंना रोटरीच्या ‘बेस्ट असिस्टंट गवर्नर’ पुरस्कार
कऱ्हाड : येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी रणजित शेवाळे यांना राज्यातील तेरा जिल्ह्यातून ‘बेस्ट असिस्टंट गवर्नर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथे १४ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
अहमदनगर येथे झालेल्या कार्यक्रमास इंदोर प्रांतामधील रोटरीचे माजी गव्हर्नर गजेंद्र नारंग उपस्थित होते. सोबत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतिपवळे, माजी गव्हर्नर हरिश मोटवाणी, शिरिष रायते, प्रमोद पारीख, स्वाती हेरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तेरा जिल्ह्यांमधून आलेल्या निवडक पदाधिकारींसोबत रोटरी क्लबचे सर्व अध्यक्ष व सचिव यांनी वर्षभरामध्ये केलेले विविध सामाजिक उपक्रम व इतर कार्यावर आधारित असे हे पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत दिमाखात पार पडले.
सातत्याने समाजाची खरी गरज ओळखून धडाडीने कार्य करणारे व रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर या पदावर कार्य करताना रणजित शेवाळे यांच्यासोबत असणारे रोटरी क्लब ऑफ मलकापूर, पाटण, उंब्रज व वाई या क्लबनेही उत्कृष्ट कार्याच्या जोरावर अनेक बक्षिसे पटकावली. यामध्ये मलकापूर क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर व वाई क्लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांना डिस्टिकमधील टॉप बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, वाई क्लबला सर्वोच्च बेस्ट क्लब असा पुरस्कार मिळाला.
फोटो १७रणजीत शेवाळे
रणजित शेवाळे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.