रोटरी क्लब सामाजिक दायित्वासाठी कटिबद्ध : अजित क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:41+5:302021-02-05T09:17:41+5:30
वाई : रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाते. जागतिक स्तरावर पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी पोलिओ मोहीम ...

रोटरी क्लब सामाजिक दायित्वासाठी कटिबद्ध : अजित क्षीरसागर
वाई : रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाते. जागतिक स्तरावर पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी पोलिओ मोहीम राबविली जात असून, रोटरी क्लब सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उद्गार पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी काढले.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, रोटरी क्लब ऑफ वाईचे पदाधिकारी माजी सचिव दीपक बागडे, सचिव जितेंद्र पाठक, नीला कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लबतर्फे रविवारी पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात ग्रामीण रुग्णालय वाई येथे सकाळी करण्यात आली. या मोहिमेसाठी रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे तीन दिवस वाईमध्ये प्रचार मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन नागराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. तसेच वाई तालुक्यात मोहिमेसाठी कार्यरत असणाऱ्या सर्व एएनएम, जीएनएम, आशा वर्कर, हेल्थ वर्कर्स यांना फूड पॅकेट्सचे वाटप रोटरी क्लबद्वारे करण्यात आले.