पाटण तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:47+5:302021-01-08T06:04:47+5:30

दुरंगी लढत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये मेंढेघर, हुंबरळी, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, पेठशिवापूर, मुरुड, बांबवडे, मुळगाव, तामकडे, काळोली, शिद्रुकवाडी, कुंभारगाव, ...

Rope for 72 Gram Panchayats in Patan taluka | पाटण तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच

पाटण तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेच

दुरंगी लढत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये मेंढेघर, हुंबरळी, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, पेठशिवापूर, मुरुड, बांबवडे, मुळगाव, तामकडे, काळोली, शिद्रुकवाडी, कुंभारगाव, केळोली, त्रिपुडी, चोपडी, सुळेवाडी, सोनवडे, नावडी, पापर्डे, मणदुरे, साखरी, जानुगडेवाडी, गुढे, कुठरे, काळगाव, तारळे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. इतर ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. मात्र, त्यामध्ये एक ते दोन वॉर्ड बिनविरोध झालेले आहेत. काही ठिकाणी बाकी वाॅर्ड बिनविरोध; पण केवळ एक ते दोन वाॅर्डसाठी निवडणूक अशी स्थिती आहे. नेचल, डोंगळेवाडी, वाडीकोतावडे, धावडे, काहिर, मालोशी, बांबवडे, आंबळे, काढणे, चिखलेवाडी, करपेवाडी, खळे, मानेवाडी, बोंद्री, कवडेवाडी, टोळेवाडी, कातवडी, पिंपाळोशी, चीटेघर, पाठवडे, चव्हाणवाडी, खोणोली, शिंगणवाडी, चोपदारवाडी, कोरिवळे, हावळेवाडी, चापोली, मेंढोशी, ठोमसे, बोडकेवाडी, मंद्रूळहवेली, बाचोली, निगडे, उमरकांचन, कसणी, मोरेवाडी, पवारवाडी, सुपुगडेवाडी, धामणी, चव्हाणवाडी, मस्करवाडी आदी ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे.

- चौकट

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती

नानेल, गोषटवाडी, आटोळी, पाचगणी, काहिर, आंबेघर तर्फ मरळी, डांगिस्टेवाडी, दुसाळे, वजरोशी, वांझोळे, नेरळे, कावरवाडी, खिवशी, घाणबी, आंबवणे, कारवट, केर, सुरूल, विरेवाडी, वाघजाईवाडी, आंब्रुळे, आडदेव, सांगवड, कोदळ, पुनर्वसित, दिवशी बुद्रुक, टळेवाडी, अस्वलेवाडी, जरेवाडी, नाडोली, सळवे, ताम्हिणे, पाळशी, कोळेकरवाडी, सातर, पाचपुतेवाडी, वाझोली अशा ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

- चौकट

७२ ग्रामपंचायतींसाठी ११४४ उमेदवार रिंगणात

पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सदस्य पदांची एकूण संख्या ८०९ आहे. त्यापैकी ४९ जागांसाठी अर्ज न आल्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्या आहेत. या निवडणुकीत एकूण १ हजार ६२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४७६ जणांनी माघार घेतली. सध्या एकूण १ हजार १४४ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच ३६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या ७२ आहे.

Web Title: Rope for 72 Gram Panchayats in Patan taluka