कोयना दूध संघाकडून न्यायाची भूमिका : वसंतराव जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:34 IST2021-04-03T04:34:58+5:302021-04-03T04:34:58+5:30
मसूर : सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून सहकारमहर्षी आर. डी. पाटील यांनी कोयना दूध संघाची स्थापना केली. या कोयना ...

कोयना दूध संघाकडून न्यायाची भूमिका : वसंतराव जगदाळे
मसूर : सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून सहकारमहर्षी आर. डी. पाटील यांनी कोयना दूध संघाची स्थापना केली. या कोयना दूध संघाला प्रगतिपथावर नेण्याचे काम विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले. त्यांच्या आदर्शानुसार वाटचाल करत सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका कोयना दूध संघाने घेतली आहे,’ असे प्रतिपादन संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे यांनी केले.
हणबरवाडी (ता. कऱ्हाड) येथील भवानी दूध संस्थेने गतवर्षी कोयना दूध संघास सर्वाधिक दूध पुरवठा करताना दि्वतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल संस्थेला प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करताना ते बोलत होते. यावेळी कोयना दूध संघाचे सहायक व्यवस्थापक तानाजीराव पाटील, भवानी दूध संस्थेचे चेअरमन दादासोा पवार, माजी सरपंच जयसिंग पवार, माजी पोलीसपाटील संभाजी पवार, अर्जुन देसाई, अजित देसाई, हणमंत कदम, बाबासोा पवार, मोहन पोळ, जयवंत पवार आदींसह दूध उत्पादक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
भवानी दूध संस्थेचे चेअरमन दादासोा पवार यांनी स्वागत केले. व्हाईस चेअरमन पांडुरंग पोळ यांनी प्रास्ताविक केले. सचिव बाळासोा पवार यांनी आभार मानले.