रस्ते खचले; पुलांचे भरावही वाहिले

By Admin | Updated: August 3, 2014 22:48 IST2014-08-03T22:19:29+5:302014-08-03T22:48:42+5:30

वाहतुकीचा बट्ट्याबोळ : कऱ्हाड, जावळी, सातारा, खंडाळा तालुक्यांतील दळणवळण विस्कळीत

Roads diminished; The filling of the bridges also came | रस्ते खचले; पुलांचे भरावही वाहिले

रस्ते खचले; पुलांचे भरावही वाहिले

सातारा : यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेय की काय, अशी शंका असतानाच पावसाने आपला जोर वाढविला आणि बघता-बघता नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटकाही बसत आहे. डोंगरकडे कोसळण्याची भीती असतानाच दरड कोसळून रस्ते बंद होतायत, घरांना तडे जाऊन लोकांवर बेघर होण्याची वेळ येत आहे. अशातच रेंगडी येथील रस्ता खचल्याने, शिरवळ, किडगाव येथील साकव पुलांचे भराव वाहून गेल्याने आणि संगमनगर धक्का पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.
--साकव पुलाला खिंडार..
---किडगाव पुलाची दोनच महिन्यात दुरवस्था
---संगमनगर धक्का पूल धोकादायक
---दुरुस्तीला मिळतोय ‘धक्का’

भूवैज्ञानिकांनी केली रेंगडी गावाची पाहणी
रेंगडी : आपत्ती निवारणासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना
पाटण : सतत चर्चेत राहिलेला कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या पुलावरून नदीपलीकडील ३५ गावांतील नागरिक ये-जा करतात. कोयनेला आलेल्या पुलामुळे हा पूल सतत पाण्याखाली जातो. तरीही जीव धोक्यात घालून काहीजण या पुलावरून प्रवास करतात. त्यातच या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षित लोखंडी खांब तुटल्यामुळे अडचणीत भर पडली आहे.नाव, वाघणे, कोडोली, चाफेर, मणेरी, लेंडोरी, कुसवडे, वेंढघर, तळीये, गोवारे आदी ३५ गावे कोयना नदी पुलापलीकडे आहेत. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमनगर धक्का पूल सलग आठ ते पंधरा दिवस पाण्याखाली राहतो. एवढी गंभीर समस्या अनेक वर्षांपासून सुटलेली नाही. त्यामुळे पस्तीस गावांतील नागरिक नेमका कुणावर विश्वास ठेवायचा? मंत्री आमच्या काय कामाचे, असा सवाल करू लागली आहे.

नुकतेच उपमुख्यमंत्र्यांनी याच धक्का पुलावरून येऊन नवीन पुलाचे भूमिपूजन केले. तेव्हा या जुन्या पुलाचे संरक्षित खांब तुटलेले होते. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नवीन पूल तयार होईपर्यंत धक्का पुलाचा वापर होणार आहे. त्यामुळे याची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कड्यांखालच्या गावकऱ्यांचे पुनर्वसनासाठी साकडे

Web Title: Roads diminished; The filling of the bridges also came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.