रस्ता झाला; मात्र साईडपट्ट्या दुर्लक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:35+5:302021-06-05T04:27:35+5:30

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पवारमळा ते मराठानगर (गुंडेवाडी) येथील राज्यमार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र, तेव्हापासून या मार्गाच्या ...

The road was paved; But the sidebars are ignored! | रस्ता झाला; मात्र साईडपट्ट्या दुर्लक्षित !

रस्ता झाला; मात्र साईडपट्ट्या दुर्लक्षित !

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पवारमळा ते मराठानगर (गुंडेवाडी) येथील राज्यमार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र, तेव्हापासून या मार्गाच्या कडेच्या साईडपट्ट्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. या दुर्लक्षित साईडपट्ट्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

परिसरातून सुमारे दीडशे किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्ग जात आहे. या राज्य मार्गातील मायणीपासून ते पंढरपूर पर्यंतचे सुमारे शंभर किलोमीटरच्या अंतराचे काम सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून, या राज्य मार्गाचे चांगल्या पद्धतीने रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता जवळजवळ रुंदीकरण (काही ठिकाणचा अपवाद वगळता) हा संपूर्ण मार्ग पूर्ण झाला आहे.

याउलट स्थिती मायणीपासून मल्हारपेठकडे जाणाऱ्या मार्गाची झाली आहे, हा मार्ग मायणी, पवारमळा, मराठानगर, चितळी या सुमारे सात किलोमीटर अंतरावर अजूनही एकच आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या मार्गावरील पवारमळा मराठानगर (गुंडेवाडी) या भागातील राज्य मार्गाचे काम कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले होते, तेही रुंदीकरण नव्हते. पूर्वीच्याच मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून संबंधित ठेकेदाराने या मार्गाकडेच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम झाले नाही किंवा हे काम करून घेण्याकडे अधिकाऱ्यांनीही जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. सध्या पडत असलेल्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या पूर्वीच्या साईडपट्ट्यांवर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. समोरून येणारी वाहने एकमेकांना साईड देताना या चिखलातून लहान-मोठे अपघात सतत घडत आहेत. शिवाय खाली कोण उतरायचे यावरून सतत शाब्दिक वादावादी होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येणाऱ्या पावसापूर्वी या मार्गाच्या साईडपट्ट्या चांगल्या पद्धतीने करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

(चौकट)

मल्हारपेठ-पंढरपूर हा सुमारे दीडशे किलोमीटरचा एकच राज्यमार्ग आहे. मात्र, या राज्यमार्गावर रुंदीकरणासाठी वेगळा विभाग तयार केला असून, यासाठी वेगवेगळी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यातील शंभर किलोमीटरचे अंतर रुंदीकरण सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण झाले आहे तर पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर अजून कसल्याही प्रकारचे काम सुरू होताना दिसत नाही. त्यामुळे नक्की हा मार्ग कशामुळे रखडला आहे, हे मात्र अद्याप कळू शकत नाही.

कोट...

पवारमळा ते मराठानगर (गुंडेवाडी) या दरम्यानच्या मार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सहा महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने साईडपट्ट्याही भरल्या नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात सतत घडत आहेत. तसेच या कामाकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.

-दादासाहेब निकम, गुंडेवाडी, माजी सरपंच प्रतिनिधी

०४मायणी

पवारमळा ते मराठा नगर दरम्यानच्या साईडपट्ट्या व्यवस्थित न भरल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया: संदीप कुंभार)

===Photopath===

040621\img-20210604-wa0013.jpg

===Caption===

(पवार मळा ते मराठा नगर दरम्यानच्या साईट पट्ट्या व्यवस्थित नभरल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे - संदीप कुंभार)

Web Title: The road was paved; But the sidebars are ignored!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.