रस्त्यावर कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST2021-01-04T04:32:01+5:302021-01-04T04:32:01+5:30

जिल्ह्यातील १९ कोरोना सेंटर बंद सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून कोविड रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात ...

Road congestion | रस्त्यावर कोंडी

रस्त्यावर कोंडी

जिल्ह्यातील १९ कोरोना सेंटर बंद

सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून कोविड रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात २६ पैकी साताऱ्यातील जंबोसह केवळ सात कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्यात आली आहेत. पुढील काही दिवसांत रुग्ण संस्थेचा आढावा घेऊन उर्वरित कोविड सेंटर बंद करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन उर्वरित सेंटरबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

बिबट्याचा हल्ला

कुडाळ : वरोशी येथे बिबट्याने दोन बोकड फस्त केल्याची घटना घडली असून, एक शेळी जीव वाचविण्यासाठी पळाली असता उंच कड्यावरून पडून जखमी झाली. केळघर परिसरात या बिबट्याची दहशत वाढल्याने शेतकरी जनावरे चरायला सोडण्यास घाबरत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Road congestion