रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:22+5:302021-06-04T04:29:22+5:30

मल्हारपेठ : मारुल हवेली ते दिवशी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मारुल हवेलीमार्गे दिवशीला जाणारा हा मार्ग गत काही वर्षांपासून ...

Road condition | रस्त्याची दुरवस्था

रस्त्याची दुरवस्था

मल्हारपेठ : मारुल हवेली ते दिवशी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मारुल हवेलीमार्गे दिवशीला जाणारा हा मार्ग गत काही वर्षांपासून खराब झाला आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निसरे, सोनाईचीवाडी, गारवडे, साजुर, बहुले, नावडी परिसरातील ग्रामस्थांना ढेबेवाडीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून मारुल हवेली ते दिवशी मार्गाचा वापर होतो.

वीज खंडित

कऱ्हाड : तालुक्यात दररोज माॅन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस झोडपून काढीत असून, परिणामी वीजपुरवठा खंडित होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच विद्युतदाब वाढल्याने उपकरणांचेही नुकसान होत आहे.

डासांचा उपद्रव

कऱ्हाड : वातावरणातील बदलामुळे कऱ्हाडसह मलकापूर, आगाशिवगरनगर परिसरात डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. घरोघरी डासांचा त्रास वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. अगोदरच माॅन्सूनपूर्व पडणारा पाऊस आणि त्यातच डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांपासून बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे.

श्वानांची दहशत

मसूर : येथील कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात श्वानांची दहशत वाढली आहे. चौकात दररोज रात्री १५ ते २० श्वान रस्त्यावर आढळून येत आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांत भीती निर्माण होत आहे. चारचाकी वाहनधारकांना फारशी भीती नाही. मात्र, दुचाकीस्वारांचा पाठलाग होत असल्याने अपघाताची शक्यता आहे.

Web Title: Road condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.