रिक्षाचालकाला आत्महत्येस प्रवृत्त; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST2021-09-16T04:49:51+5:302021-09-16T04:49:51+5:30
सातारा : येथील करंजे पेठेतील रिक्षाचालक विजय ननावरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला ...

रिक्षाचालकाला आत्महत्येस प्रवृत्त; दोघांना अटक
सातारा : येथील करंजे पेठेतील रिक्षाचालक विजय ननावरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेमा आगरे, शेखर आगरे (रा. खारी विहिरीजवळ, सातारा), राजू पाेतनीस (रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, यापैकी शेखर आणि राजूला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षाचालक विजय ननावरे यांनी काही दिवसांपूर्वी भूविकासजवळील एका हाॅटेलच्या पार्किंगमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ननावरे यांची पत्नी वैशाली ननावरे यांनी फिर्याद दिल्यानंतर या तिघांवर गुन्हा दाखल झाला. संबंधितांनी अनैतिक संबंधांची माहिती तुझ्या पत्नीला देईन, अशी धमकी देत लाखो रुपये उकळले. यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.