शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

टीव्ही चोरल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:13 IST

त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न घेता अभिजितच्या खुनाची कबुली दिली.

ठळक मुद्देमित्राला अटक : तीन दिवस पोलीस कोठडीडंपरच्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार

सातारा : क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील अभिजित मोहिरे (वय ३२) या रिक्षाचालकाचा खून त्याच्या मित्रानेच केला असल्याचे तपासात समोर आले असून, घरातील टीव्ही चोरल्यामुळेच अभिजितचा खून केल्याची कबुली मित्राने पोलिसांकडे दिली आहे.

अमोल तानाजी चव्हाण (वय ३५, रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) असे अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, क्षेत्र माहुली येथील अभिजित मोहिरे हा रिक्षा व्यावसायिक होता. गुरुवारी रात्री नऊ वाजता तो घरी गेला. त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न घेता अभिजितच्या खुनाची कबुली दिली.

अभिजित आणि अमोल हे लहानपणापासून मित्र होते. महिनाभरापूर्वी अभिजितने अमोलचा टिव्ही चोरला होता. त्यावेळी अमोलने त्याच्याकडे पैसे मागितले. हे पैसे देण्यास अभिजितने सहमती दर्शवली होती. या पैशावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. एके दिवशी अभिजितने अमोलच्या तोंडावर फाईट मारून त्याचे दात पाडले होते. याचा राग अमोलच्या मनात खदखदत होता. गुरूवारी अभिजित रिक्षा घेऊन घरी आल्यानंतर अमोल त्याच्या घरात गेला. यावेळी पुन्हा या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अमोलने संतापाच्या भरात अभिजितच्या डोक्यात फरशी घातली. अभिजित रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे पाहून अमोलने तेथून पळ काढला होता.

सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांनी अमोल चव्हाण याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने अमोलला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

 

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठारसातारा : दुचाकीवरून घरी येत असताना डंपरने दिलेल्या धडकेत  दुचाकीवरील सचिन चंद्रकांत गुजर (वय ३५, रा. भोंदवडे, ता. सातारा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजापुरी फाट्यावर झाला.याबाबत अधिक माहिती अशी, सचिन गुजर हा वनविभागामध्ये काम करत होता. ठोसेघर, ता. सातारा येथे त्याची ड्यूटी होती. सायंकाळी ड्यूटी संपवून तो मित्रासमवेत दुचाकीवरून घरी येत होता. राजापुरी फाट्यावर आल्यानंतर समोरून आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन गुजर हा जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी जखमी मित्राला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर