वडोली निळेश्वर येथे विकासासाठी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:36 IST2021-03-06T04:36:37+5:302021-03-06T04:36:37+5:30

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे गावातील विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात ...

Review meeting for development at Vadoli Nileshwar | वडोली निळेश्वर येथे विकासासाठी आढावा बैठक

वडोली निळेश्वर येथे विकासासाठी आढावा बैठक

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे गावातील विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

या बैठकीत विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. निधीचा विनियोग चांगला झाला पाहिजे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी कऱ्हाड उत्तर काॅंग्रेसचे खजिनदार जे. के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक पवार, सदस्या सुलोचना पवार, नीलम मंडले, जालिंदर पवार, रमेश पवार, विजय पवार, नीलेश पवार, अशोक मंडले, कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीचे सदस्य डी. एस. काशीद, जगन्नाथ पवार, मधुकर पवार, अनिल पवार, राजेंद्र पवार, बाबासो पवार, संभाजी पवार, दिनकर पवार, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. ‌ तसेच अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Web Title: Review meeting for development at Vadoli Nileshwar