पेन्शनपत्रासाठी निवृत्त पोलीस करणार बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:19+5:302021-01-23T04:40:19+5:30
सातारा : जून २०२० पासून तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतन तसेच पेन्शनपत्र न मिळाल्याने २५ जानेवारीपासून पोलीस मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास ...

पेन्शनपत्रासाठी निवृत्त पोलीस करणार बेमुदत उपोषण
सातारा : जून २०२० पासून तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतन तसेच पेन्शनपत्र न मिळाल्याने २५ जानेवारीपासून पोलीस मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तुषार अहिवळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तुषार आनंदराव अहिवळे (रा. दिव्यनगरी, कोंडवे, ता. सातारा) हे ३१ मे २०१९ रोजी जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना प्रथम सहा महिन्यांचे व द्वितीय सहा महिन्यांच्या कालावधीतील तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन अदा केले आहे. परंतु, आता आठ महिने झाले तरी जून २०२० पासून त्यांना मिळणारे तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन अदा करण्यात आले नाही. तसेच पेन्शन पत्रही त्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे अहिवळे यांनी पोलीस मुख्यालयासमोर बेमुदत उपाषेण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनाही निवेदन दिले आहे.