शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

जादा परताव्याचे आमिष; साताऱ्यातील सेवानिवृत्त व्यक्तीची ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:37 IST

विशेष म्हणजे, गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा नफा मोबाइल स्क्रीनवर दिसत असल्याने त्यांचा संबंधितांवर विश्वास बसला. मात्र..

सातारा : जादा परताव्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल ६१ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मेहबूब शेख (वय ५७, रा. बापुजी साळुंखे नगर, विलासपूर, सातारा) हे सेवानिवृत्त आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक संशयास्पद लिंक आली. ही लिंक ओपन केल्यानंतर गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ‘मुनोथ इनसाई क्लब मुनोथ’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले.या ग्रुपच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानुसार जुलै २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्यांनी वेळोवेळी एकूण ६१ लाख २५ हजार रुपये गुंतवले. विशेष म्हणजे, गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा नफा मोबाइल स्क्रीनवर दिसत असल्याने त्यांचा संबंधितांवर विश्वास बसला.मात्र, जेव्हा त्यांनी गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद गवळी हे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Retiree Loses ₹61 Lakh in Online Investment Scam

Web Summary : A Satara retiree lost ₹61.25 lakh in an online scam after being lured with high investment returns via a WhatsApp group. He invested from July to August 2025, only realizing the fraud when he couldn't withdraw funds. Police are investigating.