शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: चितळीत पूर्ववैमनस्यातून निवृत्त जवानाचा खून, दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:47 IST

तलवार, कुऱ्हाडीने हल्ला 

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील सेवानिवृत्त जवान रणजीत मदन निकम (वय ३८) यांचा गावातील महादेव मंदिरानजीकच्या तालमीसमोर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत मायणी व वडूज पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!चितळी येथील तालमीमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रणजीत निकम हे आपल्या मुलाला घेऊन गेले होते. काही कामानिमित्त ते तालमीच्या बाहेर आले. त्यावेळी मागून पृथ्वीराज संभाजी पवार (२२), पवन संतोष पवार (१९), संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार व एक अल्पवयीन मुलगा, असे पाच जण (सर्व रा. चितळी, ता. खटाव, जिल्हा सातारा) तेथे आले. त्यांनी तलवार, कोयता व कुऱ्हाडीने जवान रणजीत निकम यांना जबर मारहाण केली आणि ते पळून गेले. जखमी रणजीत यांना मायणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी रात्री उशिरा पृथ्वीराज पवार व पवन पवार या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि.२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अन्य दोघे व एका अल्पवयीन आरोपी मुलाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील, बीट अंमलदार आनंदा गंबरे तपास करीत आहेत.गावात पोलिस बंदोबस्तचितळी येथे जवानाचा खून झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. गावात तणावाची परिस्थिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Retired Soldier Murdered in Chitli; Two Arrested

Web Summary : A retired soldier, Ranjeet Nikam, was murdered in Chitli, Satara. The attack, stemming from prior animosity, involved swords and axes. Police arrested two suspects and are searching for others involved. Tensions are high, and police presence has increased in the village.