फलटणमधील प्रतिबंधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST2021-09-02T05:26:01+5:302021-09-02T05:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व ...

Restricted in Phaltan | फलटणमधील प्रतिबंधित

फलटणमधील प्रतिबंधित

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व आरोग्य विषयक उपक्रम राबवून साजरा करावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

फलटण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, पोलीस निरीक्षक भारत किंद्र, नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपेक्षा अधिक उंचीची गणेशमूर्ती बसवू नये. मंडळांनी जास्तीत जास्त आरोग्य विषयक उपक्रम राबवावे. फलटण तालुक्यात कोरोनाचे दररोज १०० ते १५० रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, आरती, भजन, कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, श्री गणेशाच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये एक गाव, एक गणपती ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केले. बैठकीस फलटणमधील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.

Web Title: Restricted in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.