तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना हॉस्पिटल्स पूर्ववत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST2021-08-13T04:45:39+5:302021-08-13T04:45:39+5:30
कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरू करावेत, अशी ...

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना हॉस्पिटल्स पूर्ववत सुरू करा
कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी करणारे ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.
पिंपोडे बुद्रूक ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळा आणि वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयातील कोरोना केअर्स सेंटर्स तत्काळ सुरू करावीत, कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात नेमलेला कंत्राटी कर्मचारीवर्गाला कमी करू नये, आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतींनी सौरऊर्जा कनेक्शन जोडावीत, यासाठी शिफारस करणारा ठराव करण्यात आला.
स्वच्छ भारत अभियान, कुपोषण कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम यासह पाणलोट विकास कार्यक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना खातेप्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.
कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरु करावेत, अशी मागणी करणारे ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.
सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.
पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळा आणि वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयातील कोरोना केअर्स सेंटर्स तात्काळ सुरु करावीत, कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात नेमलेला कंत्राटी कर्मचारी वर्गाला कमी करु नये, आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतींनी सौरउर्जाद्वारे कनेक्शन जोडावीत, यासाठी शिफारस करणारा ठराव करण्यात आला.
स्वच्छ भारत अभियान, कुपोषण कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम यासह पाणलोट विकास कार्यक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना खातेप्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.