शामगाव ग्रामस्थांकडून लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST2021-04-13T04:37:05+5:302021-04-13T04:37:05+5:30

शामगाव : ता. कऱ्हाड येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेस शामगाव ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी दोन तासात ...

Response to vaccination from Shamgaon villagers | शामगाव ग्रामस्थांकडून लसीकरणाला प्रतिसाद

शामगाव ग्रामस्थांकडून लसीकरणाला प्रतिसाद

शामगाव : ता. कऱ्हाड येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेस शामगाव ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी दोन तासात सत्तर जणांना लस देण्यात आली.

मसूर आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या शामगाव आरोग्य उपकेंद्र येथे दर शनिवारी लसीकरणाचे आयोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये नावनोंदणी करण्यात येत आहे.

पहिल्याच आठवड्यात सुमारे तीनशे लोकांनी आपली नाव नोंदणी केली. शनिवारी आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर झाले. परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण रद्द करण्यात आले होते .लोक आरोग्य उपकेंद्राकडे घिरट्या घालत होते. शेवटी दुपारी तीन वाजता लस उपलब्ध झाली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. फक्त दोन तासात सत्तर लोकांना लसीकरण करण्यात आले.

यावेळी मसूर आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. रमेश लोखंडे, आरोग्य सेवक अरुण साळुंखे, आरोग्य सेविका जे. एच. जाधव, सरपंच शीतल गायकवाड , उपसरपंच बाळासाहेब पोळ, भीमराव डांगे, सुनील गायकवाड , महेंद्र जाधव, सुनील पोळ, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Response to vaccination from Shamgaon villagers