विठामाता विद्यालयाच्या वासंतिक शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:22+5:302021-05-03T04:33:22+5:30
विठामाता विद्यालयाच्या वतीने आयोजित या ऑनलाईन शिबिरात दररोज योगासने व प्राणायाम, अक्षरलेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, वारली पेंटिंग, ...

विठामाता विद्यालयाच्या वासंतिक शिबिरास प्रतिसाद
विठामाता विद्यालयाच्या वतीने आयोजित या ऑनलाईन शिबिरात दररोज योगासने व प्राणायाम, अक्षरलेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, वारली पेंटिंग, भरतकाम, कोरोना काळात घ्यावयाचा आहार व काळजी अशा विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. लोकसेवा परीक्षेत देशात प्रथम आलेले शास्त्रज्ञ चारूदत्त साळुंखे यांची ऑनलाईन मुलाखतही घेण्यात आली.
नीता जयवंत पाटील यांनी वारली पेंटिंग मुलींना शिकविले. प्रज्ञा वाळिंबे यांनी भरतकाम शिकविले. धनश्री कुलकर्णी यांनी टाकाऊपासून टिकाऊ, शिक्षक जे. एन. कांबळे यांनी चित्रकला, मीना घळसासी, उज्ज्वला शिंदे यांनी योगाचे धडे दिले; तर डॉ. शुभांगी देशपांडे, मीरा प्रभूमिरासी यांनी ‘कोरोना काळातील काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका व्ही. एस. पवार, उपमुख्याध्यापक एम. पी. कदम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.