‘लोकमत’च्या दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलला प्रतिसाद
By Admin | Updated: October 17, 2014 22:46 IST2014-10-17T21:40:51+5:302014-10-17T22:46:33+5:30
नॅनोचे आकर्षण : भरघोस बक्षिसांमुळे खरेदीसाठी पसंती

‘लोकमत’च्या दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलला प्रतिसाद
सातारा : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘दसरा दिवाळी शॉपिंग कार्निव्हल’ला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. खरेदीबरोबरच ‘लकी ड्रॉ’द्वारे मोठमोठी बक्षिसे देण्यात येणार असल्याने या योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याकडे कल वाढत आहे.
योजनेतील सहभागी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांनी दसरा-दिवाळीसाठी खरेदी केल्यास त्यांना एक कूपन दिले जाते. या कूपनमधून दिवाळीपूर्वी एक आणि दिवाळीनंतर एक असे दोन लकी ड्रॉ काढण्यात येतात. भाग्यवान विजेत्यांना मोठी बक्षिसे दिली जातात. यावर्षी ‘हेम मोटर्स प्रा. लि.’ यांच्याकडून प्रथम विजेत्या भाग्यवंतास बंपर बक्षीस म्हणून नॅनो कार देण्यात येणार आहे. ‘फिनिक्स’ आटाचक्की आणि वॉटर प्युरीफायर कंपनीने या योजनेचे सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे.
बंपर बक्षिसाव्यतिरिक्त पहिले बक्षिस ३२ इंची एलईडी टीव्ही, दुसरे बक्षीस वॉटर प्युरिफायर (तीन विजेत्यांना), तिसरे बक्षिस आटाचक्की (दोन विजेत्यांना) आणि चौथे बक्षिस १६३ लिटरचा फ्रीज (दोन विजेत्यांना) अशी बक्षिसांची लयलूट असल्यामुळे या योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडे दिवाळीच्या खरेदीचा ओघ वाढता दिसत आहे.
हेम ग्रुप, ‘फिनिक्स’ यांच्या व्यतिरिक्त नंदिनी इलेक्ट्रॉनिक्स, ओम एन्टरप्रायजेस, कोमल इन्फोटेक, एस. कच्छी अँड कंपनी, बालाजी मोबाइल गॅजेट झोन, सोनी कस्टम्स अँड वॉचेस, ओम क्रोकरी आणि हॉटेल राधिका पॅलेस यांच्याकडूनही बक्षिसे प्रायोजित करण्यात आली आहेत.
दिवाळीपूर्व लकी ड्रॉसाठी द्वितीय बक्षिस दोन वॉटर प्युरिफायर, तृतीय बक्षिस आटाचक्की आणि चतुर्थ बक्षिसएक १६३ लिटरचा फ्रिज अशी असून, हा ड्रॉ दिवाळीपूर्वी काढण्यात येणार आहे. याखेरीज दिवाळीपूर्व आणि दिवाळीनंतर काढण्यात येणाऱ्या दोन्ही लकी ड्रॉमध्ये प्रत्येकी २०० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी ४०० गिफ्ट हॅम्परची योजना करण्यात आली आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांसाठीही बक्षीस
योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांमधूनही दिवाळीनंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्या भाग्यवान व्यापाऱ्याला लॅपटॉप बक्षिस देण्यात येणार आहे.