सातारा : साताऱ्यातील राजवाड्याजवळील महात्मा गांधी मैदानावर महात्मा गांधीजींना सद्भावना दिवस, पाळून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी चालू असलेल्या दिल्लीतील किसान आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर केला गेला. दिल्ली आंदोलनात सामील झालेल्या महिला शेतकरी आणि कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. शैला जाधव, कैलास जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, वनिता वाटाम्बळे, सीमा बळीप, रुकसाना काझी, मंदा यादव, मालन कांबळे, सिंधू कांबळे, पूजा कांबळे, ऊर्मिला कांबळे, अलका बल्लाळ, मनीषा बल्लाळ, बायडाबाई मदने, कविता बनसोडे, मालती जावळे, सुरेखा कांबळे, हृषिकेश पाटील, प्रा. संजीव बोंडे, शोभा बल्लाळ यांचा सत्कार प्रा. डी. बी. जाधव, प्रदीप देसाई, नाना जावळे, संजय कुंभार, शिवाजी कुंभार, आमिषा कुंभार, प्रज्ञा कांबळे, रेणुका माने, राजीव मुळ्ये, अॅड. वनराज पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘गांधीजींची हत्या करणाऱ्या प्रवृत्ती आज देशात प्रबळ झाल्या आहेत. लोकशाहीची हत्या करीत आहेत. २६ जानेवारी रोजी केलेली दिल्ली येथील हिंसा हा शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट आहे. म्हणूनच हिंसेला उत्तर अमन, अहिंसा, सद्भावना हेच असू शकते. तीच गांधीजींना खरी आदरांजली ठरेल.’ शाहूपुरी पोलीस ठाणे अणि सातारा नगरपरिषद यांनी केलेल्या सहकार्याबद्द्ल संयोजक अॅड. शैला जाधव यांनी आभार मानले.