प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवू : बोराटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:19+5:302021-08-20T04:45:19+5:30

पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रशासनाला नेहमीच सहकार्य असते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण देतानाच मुलांकडे कोणत्याही ...

Resolve pending questions of primary teachers with priority: Borate | प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवू : बोराटे

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवू : बोराटे

पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रशासनाला नेहमीच सहकार्य असते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण देतानाच मुलांकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, सर्वेक्षण यासारखी कामे प्राथमिक शिक्षकांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार आहे’, असे आश्वासन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी दिले.

कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्यावतीने आयोजित कोरेगाव तालुका पंचायत समितीचे नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोराटे बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन शिर्के यांनी शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच इतर प्रलंबित प्रश्नही सोडवावेत, अशी भूमिका मांडली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे अभिवचन बोराटे व मिलिंद मोरे यांनी दिले.

यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, महिला आघाडीच्या अध्यक्ष मुस्कान आतार, कोरेगाव तालुका शिक्षक समितीचे कार्यकारिणी सदस्य नेताजी जगताप, उदय घोरपडे, सुरेश पवार, प्रकाश पोळ, सतीश ढमाळ, अकबर मुलाणी यांच्यासह शामराव वाघमोडे, अमीर आतार, सुनील कोकरे, शामराव बोतालजी, प्रशांत काजळे, उर्मिला शिर्के उपस्थित होते.

फोटो ओळ :- मिलिंद मोरे यांचे स्वागत नितीन शिर्के, किरण यादव, मुस्कान आतार, उदय घोरपडे, नेताजी जगताप यांनी केले.

Web Title: Resolve pending questions of primary teachers with priority: Borate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.