वीज बिलासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:37 IST2021-03-20T04:37:56+5:302021-03-20T04:37:56+5:30

कोपर्डे हवेली ता. कऱ्हाड येथे शेती पंपाच्या वीज बिल संदर्भात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ...

Resolve farmers' grievances regarding electricity bills | वीज बिलासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करु

वीज बिलासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करु

कोपर्डे हवेली ता. कऱ्हाड येथे शेती पंपाच्या वीज बिल संदर्भात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे , शाखा अधिकारी बद्रायणी यांची उपस्थिती होती.

राख म्हणाले, सप्टेंबर २०२० पर्यंतचे वीज बिलास पन्नास टक्के सवलत दिली असून ही योजना २०२३ पर्यंत चालू राहणार आहे. २०२०-२१ मध्ये भरल्यास पन्नास टक्के. २०२१-२२ मध्ये भरल्यास तीस टक्के तर २०२२-२३ मध्ये भरल्यास वीस टक्के सवलत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरुन संपूर्ण सवलतीचा लाभ घेतला पाहिजे.

यावेळी शेतकरी भास्कर चव्हाण यांनी वीजबिले वेळेत मिळत नाहीत त्यामुळे ती वेळेत भरता येत नसल्याचे सांगून यापुढे तरी शेतकऱ्यांना वीजबिले वेळच्या वेळी मिळावी अशी मागणी केली.

फोटो ओळ.

कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथेे शेतकऱ्यांच्या वीज बिलांचे शंकेचे निरसन करताना अभिमन्यू राख व इतर.

Web Title: Resolve farmers' grievances regarding electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.