सरपंच पदाच्या आरक्षणाने राजकारण पुन्हा ढवळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:18+5:302021-02-05T09:14:18+5:30
कऱ्हाड तालुक्यातील गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (पुरूष) - गोडवाडी, अकाईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, ...

सरपंच पदाच्या आरक्षणाने राजकारण पुन्हा ढवळले
कऱ्हाड तालुक्यातील गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (पुरूष) - गोडवाडी, अकाईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, वनवासमाची, अंधारवाडी, सावरघर. अनुसूचित जाती (स्त्री) - नाणेगाव, संजयनगर, बेलदरे, वनवासमाची (खोडशी), धावरवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, अंबवडे, मेरवेवाडी, कोयना वसाहत, शिंदेवाडी-विंग, डेळेवाडी, वाण्याचीवाडी. अनुसूचित जमाती - करंजोशी. इतर मागास प्रवर्ग (पुरूष) - कार्वे, कापील, पाचुंद, भोसलेवाडी, गोवारे, शामगाव, उत्तर कोपर्डे (यादववाडी), घोणशी, मालखेड, कालवडे, वडोली निळेश्वर, गोळेश्वर, बनवडी, कोळेवाडी, किवळ, इंदोली, शहापूर, हजारमाची, तुळसण, वस्ती साकुर्डी, काले, कोरीवळे, पश्चिम सुपने, संजयनगर (काले), दुशेरे, बाबरमाची (डिचोली), शेवाळवाडी. इतर मागास प्रवर्ग (स्त्री) - खोडजाईवाडी, चोरे, पाचुपतेवाडी, यशवंतनगर, अंतवडी, येणके, भुयाचीवाडी, शिवडे, सवादे, गोसावेवाडी, लोहारवाडी, भांबे, येवती, पार्ले, पेरले, साळशिरंबे, शेळकेवाडी (म्हासोली), गमेवाडी, कालेटेक, येणपे, साजुर, ओंड, हवेलवाडी, बानुगडेवाडी, उंडाळे, रिसवड, जुने कवठे. खुला प्रवर्ग (पुरूष) - कोर्टी, उंब्रज, वाघेरी, पिंपरी, कोणेगाव, उत्तर तांबवे, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, तारूख, वहागाव, चिखली, शिरवडे, म्हारूगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, कामथी, पोतले, जुळेवाडी, शेवाळवाडी (म्हासोली), जिंती, आणे, बेलवाडी, चोरजवाडी, लटकेवाडी, शेळकेवाडी (येवती), कचरेवाडी, घोलपवाडी, खोडशी, बेलवडे बुद्रुक, जखिणवाडी, गोंदी, वडोली भिकेश्वर, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनु, हेळगाव, गणेशवाडी, कालगाव, चौगुलेमळा (भैरवनाथनगर), चरेगाव, पाडळी-हेळगाव, बेलवडे हवेली, कासारशिरंबे, विठाेबाचीवाडी, केसे, हिंगनोळे, वडगाव हवेली, धोंडेवाडी, जुजारवाडी, कोरेगाव, शेणोली, नांदगाव, सैदापूर, साकुर्डी, कुसूर, आरेवाडी, मस्करवाडी, धनकवडी. खुला प्रवर्ग (स्त्री) - विजयगनर, कांबीरवाडी, कोळे, घारेवाडी, सुपने, भुरभुशी, रेठरे खुर्द, म्हासोली, वराडे, शेरे, तांबवे, गोटे, पवारवाडी, विरवडे, खुबी, मुंढे, नवीन कवठे, बामणवाडी, यादववाडी, घराळवाडी, टाळगाव, आबईचीवाडी, आटके, मुनावळे, हनुमानवाडी, हणमंतवाडी, गायकवाडवाडी, वानरवाडी, कोडोली, मसूर, तासवडे, शिरगाव, माळवाडी, घोगाव, किरपे, वारूंजी, म्होपे्र, निगडी, खराडे, टेंभू, पाल, वडगाव-उंब्रज, खालकरवाडी, वाघेश्वर, भोळेवाडी, ओंडोशी, मांगवाडी, सयापूर, नडशी, हरपळवाडी, राजमाची, येळगाव, तळबीड, मरळी, वाठार, पाडळी (केसे), करवडी, येरवळे, विंग, आदर्शनगर.
- चौकट
बहुमत आपलं; सरपंच दुसऱ्या पार्टीचा!
अनेक गावांमध्ये ज्यांचे बहुमत आहे, त्यांच्याकडे सरपंचपद आरक्षित असलेल्या प्रवर्गातील उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे बहुमत असूनही सरपंच आपला नसणार, याची खंत त्यांना सलत आहे. तसेच काही गावात सरपंचपद आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या खुल्या प्रवर्गातील काही इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.