‘आरक्षण’ नव्हे ‘सुविधां’साठी जागा !

By Admin | Updated: August 16, 2015 21:50 IST2015-08-16T21:50:32+5:302015-08-16T21:50:32+5:30

मलकापुरात बैठक : ‘अहमदाबाद पॅटर्न’प्रमाणेच होणार विकास

'Reservation' is not a place for 'convenience' | ‘आरक्षण’ नव्हे ‘सुविधां’साठी जागा !

‘आरक्षण’ नव्हे ‘सुविधां’साठी जागा !

मलकापूर : मलकापुरात अधिकारी, पदाधिकारी व अन्यायनिवारण समितीची नुकतीच संयुक्त बैठक झाली. बैठकीत ‘अहमदाबाद पॅटर्न’नुसारच शहराचा विकास करण्यावर सर्वांचे एकमत झाले. मात्र बैठकीत जमीन एकत्रिकरणातून सुविधांसाठी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मलकापूर, ता. कऱ्हाड येथे सध्या शहर विकास आराखडा हा शहराच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी नगरविकास विभागाने हरकती व सूचना मागवल्या आहेत. सहाशेपेक्षा जास्त हरकती व सूचनाही जमा झाल्या आहेत. त्याची सुनावणी होण्यापूर्वी अन्याय निवारण समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रथम आरखडाच रद्द करावा, अशी मागणी अन्याय निवारण समितीने केली व टी. पी. पद्धतीने जागा उपलब्ध करून शहराचा विकास करावा, अशी सूचनाही सदस्यांनी मांडल्या. यावर कलम ३० नुसार समावेश केलेल्या पद्धतीनुसार विकास करण्यावर नगरपंचायत पदाधिकारी ठाम आहेत. तसा ठरावही सभागृहात केला असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले. मलकापूरच्या भवितव्याचा विचार करता शहराच्या सर्व जागा आरेखामध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर शासनाच्या कलम ३१ नुसार प्रसिद्ध नकाशास आमचा विरोध असल्याचे विराधी कृती समितीचे अशोकराव थोरात व सदस्यांनी स्पष्ट केले.चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कोणत्याही एका व्यक्तीवर अन्याय होणार नाही, हे स्पष्ट केले. कलम ३० नुसारच नकाशा शासनाने मान्य करावा या भूमिकेवर आम्हीही ठाम आहोत. सुनावणीदरम्यान सर्व पदाधिकारी नगररचना उपसंचालकांना भेटून आपली बाजू मांडणार आहेत. ‘अहमदाबाद पॅटर्न’नुसार विकास करत असताना त्या त्या भागातील सर्व मिळकतदारांना जमीन एकत्रिकरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

बांधकाम करण्यास बंदी... -मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी ‘अहमदाबाद पॅटर्न’ची माहिती दिली. त्यानंतर टी. पी. स्कीम नुसार शहराचा विकास करण्यावर सर्वांचे एकमत झाले. यापुढील काळात जमीन खरेदी-विक्री करण्यास अडचण नसून बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. एन. ए. चा दाखलाही सभागृहापुढे आल्यानंतरच दिली जाईल व अपार्टमेंट बांधकाम थांबवले असल्याचेही उपनगराध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Reservation' is not a place for 'convenience'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.