सरकारमुळेच आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:30+5:302021-06-27T04:25:30+5:30

फलटण: ‘मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण जावे, या हेतूने राज्य शासनाने वेंधळा कारभार केला असल्यानेच आरक्षण न्यायालयात टिकले नाही, ...

Reservation canceled due to government | सरकारमुळेच आरक्षण रद्द

सरकारमुळेच आरक्षण रद्द

फलटण: ‘मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण जावे, या हेतूने राज्य शासनाने वेंधळा कारभार केला असल्यानेच आरक्षण न्यायालयात टिकले नाही, आरक्षण रद्द होण्याचे हे पाप या तीन तिघाडी आणि काम बिघाडी सरकारचे आहे,’ असा आरोप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.

फलटण येथे क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, अभिजित नाईक-निंबाळकर, फलटण भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, तुकाराम शिंदे, उषा राऊत, सिराज शेख, अमित रणवरे, डॉ. प्रवीण आगवणे, रियाज इनामदार, माजी नगरसेवक राजेश शिंदे, जाकीर मनेर, बाळासाहेब ननवरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Reservation canceled due to government