जीवनातील समस्यांवर संशोधन व्हावेे : साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST2021-04-02T04:41:37+5:302021-04-02T04:41:37+5:30

उंब्रज : ‘जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्राध्यापक आणि विचारवंत यांनी संशोधन करावे. ते समाजाला ...

Research should be done on the problems of life: Salunkhe | जीवनातील समस्यांवर संशोधन व्हावेे : साळुंखे

जीवनातील समस्यांवर संशोधन व्हावेे : साळुंखे

उंब्रज : ‘जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्राध्यापक आणि विचारवंत यांनी संशोधन करावे. ते समाजाला उपयोगी ठरेल,’ असे प्रतिपादन प्रा. पांडुरंग साळुंखे यांनी केले आहे.

येथील महिला महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. संजय कांबळे, उपप्राचार्य एस. टी. साळुंखे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची उपस्थिती होती.

साळुंखे म्हणाले, ‘अनेकदा एमफिल किंवा पीएचडीसारखे संशोधन हे आर्थिक लाभाच्या दृष्टीने केले जातात. त्याऐवजी संशोधनातून समाज जीवनास कसा फायदा होईल, त्या पद्धतीचे संशोधन झाले पाहिजे.’

प्राचार्य डॉ. संजय कांबळे म्हणाले, ‘विद्यार्थिनींनी शालेय अभ्यासाबरोबरच समाज विकासासाठी योगदान दिले पाहिजे. लोकांचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देण्याची जबाबदारी समाजातील सुशिक्षित आणि जागरूक वर्गाची असते. हे विद्यार्थिनींनी लक्षात ठेवले पाहिजे.’ डॉ. वंदना मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सूरज काकडे यांनी आभार मानले.

Web Title: Research should be done on the problems of life: Salunkhe