आदर्कीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST2021-07-04T04:26:14+5:302021-07-04T04:26:14+5:30
आदर्की : आदर्की-खराडे वस्ती येथील विहिरीत कोल्हा पडला होता. त्याला वनविभागाच्या टीमने सुखरूप बाहेर काढून वनक्षेत्रात सोडून देऊन कोल्ह्याला ...

आदर्कीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
आदर्की : आदर्की-खराडे वस्ती येथील विहिरीत कोल्हा पडला होता. त्याला वनविभागाच्या टीमने सुखरूप बाहेर काढून वनक्षेत्रात सोडून देऊन कोल्ह्याला जीवदान दिले.
फलटण तालुक्यातील आदर्की परिसरातील वनक्षेत्रात वृक्षारोपणाची वाढ चांगली झाल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सायंकाळी वनक्षेत्राबाहेर येतात. आदर्की येथील रामभाऊ भोईटे यांच्या विहिरीत कोल्हा पडला; पण सिमेंट बांधकाम असल्याने कोल्ह्याला विहिरीतून बाहेर निघता येईना, तेव्हा कोल्हा ओरडू लागल्याने शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी वन विभागाला माहिती दिल्याने फलटणचे वनक्षेत्रपाल मारुती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राहुल कुंभार, वनरक्षक किरण जगदाळे यांनी फलटण टीमला येथून पाचारण करण्यात आले.
सचिन जाधव, मगेश कर्वे, जयंत भरते, अभिजित निकाळजे, अतुल जाधव आदींनी विहिरीतून कोल्ह्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यास वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.