कोरेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:27+5:302021-02-05T09:18:27+5:30
कोरेगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन कोरेगाव शहर व तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ...

कोरेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
कोरेगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन कोरेगाव शहर व तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून, कोठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत झेंडा वंदन करण्यात आले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात झाला. यावेळी आमदार महेश शिंदे, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्यासह मान्यवर, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गणेश किंद्रे, तहसील कार्यालयात तहसीलदार अमोल कदम, पंचायत समिती कार्यालयात सभापती राजाभाऊ जगदाळे, पोलीस ठाण्यात निरीक्षक प्रभाकर मोरे, हुतात्मा स्मारक येथे प्रांताधिकारी ज्योती पाटील, नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, तलाठी कार्यालयात उपनगराध्यक्षा मंदा बर्गे यांनी ध्वजारोहण केले. तालुका मुख्यालय असलेल्या ठिकाणी खाते प्रमुखांनी ध्वजारोहण केले.
पदोन्नती मिळालेल्यांचा गौरव कोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार केशव फरांदे व विजय जाधव यांना सहायक उपनिरीक्षकपदी तर पोलीस नाईक मिलिंद कुंभार यांना हवालदारपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.