सातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; ७ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 04:50 PM2020-10-13T16:50:25+5:302020-10-13T16:52:54+5:30

corona virus, sataranews, civilhospital सातारा जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Reports of 242 suspects in Satara district disrupted by Corona; Death of 7 victims | सातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; ७ बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; ७ बाधितांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील २४२ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील सातारा ४, मंगळवार पेठ ४, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, रविवार पेठ २, गुरुवार पेठ २, बुधवार पेठ २, सदरबझार ९, देशमुख नगर १, शाहुपुरी ११, पंताचा गोठ १, मोळाचा ओढा १, मल्हार पेठ १, कोपर्डे १, निनाम ३, बोरखळ १, रेवडी २, आर्वी १, ढोंबरेवाडी ३, चिमणपुरा पेठ १, संकल्प कॉलनी सातारा १, गुजरवाडी २, सालवाडी १, पोवई नाका सातारा १, अपशिंगे १, राधिका रोड सातारा १, करंजे पेठ १, देगाव १, जकातवाडी १, अजिंक्य कॉलनी सातारा १, यादव गोपाळ पेठ १, काशिळ १, अतित १, वाढे ३, पाटखळ १, सैदापूर २, देगाव फाटा १, वडूथ १.

कराड तालुक्यातील कराड १२, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ २, विद्यानगर १, कोयना वसाहत २, आगाशिवनगर ३, शिवनगर ४, करवडी १, सुपणे १, वहागाव १, केसे २, तांबवे १, सावदे १, काळेवाडी ४, ओंडशी १,कर्वे ६, मलकापूर २, उंब्रज २, अटके ५, बेलदरे १, ओगलेवाडी १, खराडे १, गोंदी १, सैदापूर १, मसूर ३, कापिल १, कांबीरवाडी २, बेलवडे १, सैदापूर १, काले २, रेठरे खु २, कासार शिरंबे १,कोळे १, वाखण रोड १.

फलटण तालुक्यातील मलठण १, विद्यानगर १, लक्ष्मीनगर १, डीएड चौक १, रविवार पेठ १, फरांदवाडी १, हिंगणगाव १, बरड १, जाधववाडी ५, सस्तेवाडी १, वडजल १, काळज १, तरडगाव १, झिरपवाडी १, गिरवी १, चौधरवाडी २, जिंती नाका १.
वाई तालुक्यातील कवठे १, बेलमाची १, जांब ३, भुईंज १, गंगापुरी १.

पाटण तालुक्यातील पाटण १, मल्हार पेठ १, हरगुडेवाडी १, ढेबेवाडी १, गारवाडी १, चाफळ १, मुद्रुळकोळे १. खंडाळा तालुक्यातील अंबरवाडी 1, लोणंद 1, अहिरे 3, बोरी 1, महाबळेश्वर तालुक्यातील मेन रोड पाचगणी ६. खटाव तालुक्यातील भोसरे १, पडळ १, जाखणगाव पुसेगाव १, नागनाथवाडी १, पुसेगाव १, सिध्देश्वर कुरोली १, नेर १.

माण तालुक्यातील बिजवडी १, म्हसवड १, मार्डी १, कारखेल १, टाकेवाडी १, मलवडी १, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव १, वाठार स्टेशन ३, एकसळ १, दुघी १, रुई १, रहिमतपूर १, सासुर्वे १, वेळू १, पिंपोडे १, शेंदूरजणे १, दुर्गलवाडी १. इतर वाठार कॉलनी १, निगडी १, माजगाव १, बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर १, शिराळा १.


जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या एकंबे ता. कराड येथील ७५ वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा येथील ४८, वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा येथील ७० वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील ६१ वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण येथील ४२ वर्षीय महिला, जांब ता. खटाव येथील ७८ वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण येथील ८० वर्षीय महिला अशा एकूण ७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.

  • आत्तापर्यंत घेतलेले एकूण नमुने --१६४२९३
  • एकूण बाधित --४२०७६
  • घरी सोडण्यात आलेले --३३८७१
  • मृत्यू --१३८१
  • उपचारार्थ रुग्ण- ६८२४

Web Title: Reports of 242 suspects in Satara district disrupted by Corona; Death of 7 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.