कासाणी, घाटवणमधील १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:17+5:302021-07-02T04:26:17+5:30
पेट्री : ‘परळी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धावली (ता. सातारा) येथील आरोग्य उपकेंद्राद्वारे कासाणी व घाटवण( ता. सातारा) येथील ...

कासाणी, घाटवणमधील १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह
पेट्री : ‘परळी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धावली (ता. सातारा) येथील आरोग्य उपकेंद्राद्वारे कासाणी व घाटवण( ता. सातारा) येथील १०० नागरिकांच्या कोरोना तपासणी शिबिरादरम्यान अँटिजेन चाचणी व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये चाचणी केलेल्या सर्व नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले,’ अशी माहिती आरोग्य सेविका गीतांजली नलवडे यांनी दिली. कोरोना चाचणी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी रोहिणी सुर्वे, आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका गीतांजली नलवडे यांनी ग्रामस्तरीय समितीच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले होते.
दरम्यान, या कोरोना चाचणीच्या शिबिरामध्ये कासाणी येथील ६५ व घाटवण येथील ३५ अशा एकूण १०० नागरिकांच्या अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या असता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला. यावेळी तलाठी नंदिनी पाटील, ग्रामसेविका वर्षा दळवी, अंगणवाडीसेविका सविता बादापुरे, वनिता भगत आदी कर्मचारी उपस्थित राहून कोरोना तपासणी शिबिरासाठी मदत केली. दरम्यान, शिबिरात तपासणी केलेल्या सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. गावात कोरोना चाचणी शिबिर तत्परतेने लावल्याबद्दल कासाणी, घाटवण ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले.