पालखी मार्गाची दुरुस्ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:02+5:302021-09-12T04:45:02+5:30

मलटण : पुणे-पंढरपूर महामार्गावरून मलटणमार्गे पाचबत्ती चौकाकडे जाणारा पालखी मार्ग गेली दोन वर्षे मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे उखडला होता. या ...

Repair of palanquin route is worse than cure! | पालखी मार्गाची दुरुस्ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

पालखी मार्गाची दुरुस्ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

मलटण : पुणे-पंढरपूर महामार्गावरून मलटणमार्गे पाचबत्ती चौकाकडे जाणारा पालखी मार्ग गेली दोन वर्षे मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे उखडला होता. या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांना जिकिरीचे झाले आहे. त्यातच कधी पावसाचे पाणी, तर कधी सांडपाणी साचून खड्डा चुकवायचा की सांडपाणी, अशी द्विधा मनस्थिती वाहनचालकांची झाली आहे.

या मार्गावर दुरुस्ती होणे गरजेचे असताना, या मार्गावरच्या खड्ड्यांमध्ये पालिका प्रशासनाने चक्क कोरडी खडी वापरली आहे. त्यामुळे या वाळूसदृश खडीवरून वाहने घसरतात. खड्ड्यातून खडी बाहेर येत आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर झाल्याचे नागरिक चर्चा करत आहेत. वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे या मार्गावर त्वरित डांबर वापरून पॅचवर्क करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांची केलेली बोळवण चर्चेचा विषय ठरली आहे. पालिका प्रशासनाने कोणत्या तांत्रिक अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे, असेही नागरिक प्रश्न विचारत आहेत. मलटणमधील सर्वाधिक वाहतुकीचा हा मार्ग असल्याने त्वरित या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा नागरिकांनी आंदोलन करण्याच्या पवित्रा घेतला आहे.

110921\img_20210911_161351620.jpg

मलटण येथे पालखी मार्ग दुरुस्त करताना कोरडी खडी खड्यात भरण्यात आली आहे

Web Title: Repair of palanquin route is worse than cure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.