भरतगाववाडीत वाघजाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST2021-01-15T04:33:11+5:302021-01-15T04:33:11+5:30

नागठाणे : भरतगाववाडी येथील गावदेवी वाघजाईच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या पुढाकाराने तरुणांनी यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या वाघजाई देवीच्या ...

Renovation of Waghjai Devi temple at Bharatgaonwadi | भरतगाववाडीत वाघजाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार

भरतगाववाडीत वाघजाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार

नागठाणे : भरतगाववाडी येथील गावदेवी वाघजाईच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या पुढाकाराने तरुणांनी यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या वाघजाई देवीच्या मंदिराच्या परिसराचे नूतनीकरण केले. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी सत्यनारायण महापूजा, होमहवन, दुपारी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

गावातील भजनी मंडळाचे सायंकाळी भजन जाले. रात्री नऊच्या वेळेत संत तुकाराम महाराज वारकरी संस्था साताऱ्याचे अध्यक्ष संभाजी शेळके महाराज शेळकेवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कीर्तनास गंगाराम धनावडे यांची मृदंगसाथ, गायनाचार्य विजय महाराज कळंभे तसेच उबाळे महाराज, साहेबराव जाधव आणि वीणेकरी म्हणून राजेंद्र महाराज यांची उत्कृष्ट अशी साथ लाभली. कार्यक्रमास माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव घाडगे, धर्मा गंभरे, शरद इंगळे, राजेंद्र घाडगे, रवींद्र घाडगे, जयवंत बागल, विकास काटकर, चंद्रकांत काटकर, संजय शिंदे, प्रसाद घाडगे, प्रज्वल निकम, किरण पवार, आदी उपस्थित होते.

Web Title: Renovation of Waghjai Devi temple at Bharatgaonwadi