आले उत्पादकांना दराची लॉटरी शेतकऱ्यांना दिलासा : क्विंटलला सहा हजार रुपये दर; दोन वर्षांनंतर दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:43 IST2018-05-04T22:43:15+5:302018-05-04T22:43:15+5:30
पिंपोडे बुद्रुक : गेले जवळपास दोन वर्षे किमान पातळीवर राहिलेल्या आल्याच्या दरात झालेली उच्चांकी वाढ पाहता आल्याच्या दरातील तेजीने शेतकऱ्यांच्या चेहºयावरदेखील तेजी आल्याचे पाहावयास मिळत आहे.

आले उत्पादकांना दराची लॉटरी शेतकऱ्यांना दिलासा : क्विंटलला सहा हजार रुपये दर; दोन वर्षांनंतर दरवाढ
पिंपोडे बुद्रुक : गेले जवळपास दोन वर्षे किमान पातळीवर राहिलेल्या आल्याच्या दरात झालेली उच्चांकी वाढ पाहता आल्याच्या दरातील तेजीने शेतकऱ्यांच्या चेहºयावरदेखील तेजी आल्याचे पाहावयास मिळत आहे.
दोन वर्षे आल्याचा दर अगदीच स्थिर होऊन तो शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या पातळीवर रेंगाळत होता. त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दर व पाण्याच्या अभावामुळे बहुतांशी शेतकºयांनी आल्याची काढणी करून मिळेल त्या भावात विक्री करून समाधान मानल्याने आले लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. त्याचा नेमका परिणाम म्हणून आल्याचा दरात भरघोस वाढ झाली आहे. गेली दोन वर्षे आल्याचा दर प्रति क्विंटल सोळाशे ते दोन हजार रुपये राहिला. दिवसेंदिवस भांडवली खर्चात होणारी वाढ लक्षात घेता आल्याचा हा बाजारभाव शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने शेतकºयांनी आल्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आल्याच्या उत्पादनात घट होऊन दरात वाढ झाली. एप्रिलमध्ये नवीन लागवडीसाठी बियाणे म्हणून रुपये ३२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारे आले. सध्या ५२०० ते ६००० प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. दरम्यान आल्याच्या दरातील उच्चांकी वाढीमुळे आले उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आल्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांना जास्तीचा आर्थिक फायद्याचा गवगवा केला जात असला तरी आल्याचा मागील बाजारभाव खोडव्यापर्यंतचा उत्पादनाचा खर्च लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकºयांनीच आल्याची जोपासणा केल्याने दरवाढीचा फायदा निवडक शेतकऱ्यांनाच होणार आहे.
- दयाराम सोळस्कर, नायगाव
आल्याच्या दरात अचानक तेजी आल्याने बियाणे विकत घेऊन नवीन लागवड करू इच्छिणाºया शेतकºयाची निराशा झाली आहे.
- सुदाम पाटणकर, उपसरपंच वाघोली.