‘सिव्हिल’समोरील हातगाड्या हटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:14+5:302021-06-04T04:29:14+5:30
सातारा : निर्बंध असतानाही साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात थाटण्यात आलेल्या चहा व खाद्यपदार्थांच्या टपऱ्या गुरुवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात ...

‘सिव्हिल’समोरील हातगाड्या हटविल्या
सातारा : निर्बंध असतानाही साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात थाटण्यात आलेल्या चहा व खाद्यपदार्थांच्या टपऱ्या गुरुवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आल्या. या कारवाईवेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पथकाने सर्वांचा विरोध झुगारून रुग्णालयाचा परिसरा मोकळा केला.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध दि. ८ जूनपर्यंत कठोर केले आहेत. या कालावधीत सर्व प्रकारचे हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर दररोज खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात. ही बाब निदर्शनास येताच गुरुवारी दुपारी पालिकेच्या अतिक्रमण पथकाने संबंधित हातगाड्या हटविल्या.
या वेळी काही हातगाडीधारकांनी पथकातील कर्मचाऱ्यांची अरेरावी केली. मात्र, कायद्याचा धाक दाखविताच हातगाडीधारकांनी नमती भूमिका घेतली. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन जर कोणी केले तर संबंधितांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला.