समाज बदलणाऱ्या व्यक्तींचे स्मरण राहते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:00+5:302021-09-11T04:40:00+5:30
वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते दिनकरराव शिदोजी जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, वेणूताई चव्हाण ...

समाज बदलणाऱ्या व्यक्तींचे स्मरण राहते!
वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते दिनकरराव शिदोजी जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णेचे उपाध्यक्ष जगदिश जगताप होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रियांका ठावरे, पंचायत समितीच्या सदस्य जयश्री जाधव, अर्चना गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू, डॉ. एस. एस. घोलप, नेत्रतज्ज्ञ डॉ. रुपेश राखोंडे, कोरेगाव सोसायटीचे अध्यक्ष महादेव पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, बाळासाहेब पाटील, बाबरमाचीचे सरपंच सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहन जगताप, भानुदास जगताप, सत्यवान जगताप, दिलीप चव्हाण, शंकर ठावरे, नथुराम ठावरे यांनी स्वागत केले. श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन जगताप यांनी आभार मानले.
फोटो : १०केआरडी०१
कॅप्शन : वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते झाले.