शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बावडेकर दुकानातून 'इंद्रजाल'ची अवशेष विक्री, वनविभागाच्या विशेष तपासणी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 12:49 IST

हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे.

सातारा : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये इंद्रजाल वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात या पथकाने तपासणी करून हांजे याला चौकशीसाठी कऱ्हाडला बोलावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील काही दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळले. हे अवशेष वन विभागाने जप्त केल्यानंतर त्याचा पुरवठा कोल्हापूर येथील आयुर्वेदिक औषध विक्री करणारे बावडेकर यांनी केल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने बावडेकर दुकानाची झडती घेतली तेव्हा वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर वन विभागाने बावडेकर यांची दुकाने काही महिने बंद करण्याचे आदेश दिले होते.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर, अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये या कारवाईची व्याप्ती असल्यामुळे वन विभागाच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली. या टीमचे प्रमुख साताऱ्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते आहेत. यात कोल्हापूरचे वन्यजीवचे विभागाीय वनअधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यांचा समावेश आहे.याच पथकातील सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे गुरुवारी कोल्हापुरात अचल हांजे याच्या चौकशीसाठी कोल्हापुरात गेले होते. येथे हांजेची कसून चौकशी केल्यानंतर पुढील अधिक तपासासाठी सोमवार, दि.३१ जानेवारीला कऱ्हाड येथे बोलविण्यात आले आहे.

‘एसआयटी’ जाणार याच्या मुळाशी

समुद्री जीव असणारे इंद्रजाल अचल हांजे यानेच आपल्याला पुरविल्याचे ताब्यात असलेल्या एका आरोपीने पथकाला सांगितले. त्यामुळे हांजे याच्या चौकशीतून एसआयटी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार, हे स्पष्ट झाले आहे. समुद्रातून हा जीव काढण्यापासून तो कोणत्या मार्गे कुठे-कुठे पोहोचवला गेला याचा तपास करण्यात येणार आहे.

इंद्रजाल प्रकरणाची साताऱ्यासह सांगली आणि कोल्हापूरमध्येही व्याप्ती आहे. हा तपास गतीने व्हावा, यासाठी समांतर तपास यंत्रणा सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अचल हांजेची चौकशी सोमवारी करण्यात येणार आहे. -महादेव मोहिते, उपवनसंरक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग