शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात किकलीतील पुरातन मंदिरात आढळले प्राचीन पटखेळांचे अवशेष

By सचिन काकडे | Updated: October 21, 2024 15:51 IST

सोज्वळ साळी, साक्षी महामुलकर यांचे संशोधन

सचिन काकडेसातारा : प्राचीन खेळ संवर्धन मोहीमअंतर्गत राज्यभर ऐतिहासिक प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध व संवर्धनाचे कार्य सुरू असून, सातारा जिल्ह्यातही पटखेळांचे अवशेष शोधण्यात अभ्यासकांना यश आले आहे. नाशिकचे पुरात्वज्ञ सोज्वळ साळी व साताऱ्याच्या साक्षी महामुलकर या अभ्यासकांनी किकली (ता. वाई) येथील पुरातन भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे संशोधन केले असून, साताऱ्याच्या इतिहासात ही मोलाची भर म्हणावी लागेल.

किकलीतील भैरवनाथ मंदिर बारा ते चौादाव्या शतकातील असून, यादवकालीन स्थापत्याचे आणि भूमीज मंदिरशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याच मंदिरात एकूण सात पटखेळांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. यात नवकंकरी, वाघ - बकरी, पंचखेलिया आणि अष्टचल्लस या प्राचीन बैठ्या खेळांचा समावेश आहे. प्राचीन इजिप्त, रोम, नेपाळ तसेच प्राचीन सिलोन म्हणजेच आताचे श्रीलंका याठिकाणी या खेळांचे उगम व संदर्भ सापडताना दिसतात. या ठिकाणी आपला समृध्द प्राचीन व्यापार चालत असे. त्यामुळेच विविध प्रांतातील हे खेळ व्यापारमार्गे अनेक व्यापाऱ्यांमार्फत इथे कोरून ठेवल्याचे दिसते. हे खेळ म्हणजे जगभरातील संस्कृतीच्या अन् प्राचीन व्यापारी मार्गांच्या खुणा आहेत. म्हणूनच लिखित साधनांनंतर आता साताऱ्यातील या पुरातत्त्वीय संशोधनामुळे कऱ्हाडसह वाईचा भाग हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता, यालाही दुजोरा मिळत आहे.

किकलीतील भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळ मिळाले आहेत. असेच खेळ अजून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, हे खेळ सापडले असले तरी यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन व गावकरी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - सोज्वळ साळी, पुरातत्वज्ञ 

जिल्ह्यात प्रथमच सापडलेले प्राचीन पटखेळांचे अवशेष म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा ऐतिहासिक ठेवा इथल्या सर्वसामान्यांचा आहे, जो प्राचीन भारताच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत आहे. म्हणूनच त्याच्या प्रचार - प्रसाराबरोबरच त्याचे जतन संवर्धन गरजेचे आहे. - साक्षी महामुलकर, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर